Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Showing posts with label मराठी कविता. Show all posts

Tuesday, April 14, 2020

‘ मी’ आणि आपण सगळेच

'मी' सांगत असतो नेहमीच
अपेक्षा धरतो प्रशंसेची,
 दुसऱ्यांसोबत चांगला वागताना,
 प्रतारणा करित असतो स्वतःशीच

‘मी’ खोटं बोलतो स्वतःशीच,
त्याच्या आभासी दुनियेत नेहमीच असतो अपराजित, 
सत्य उमजूनही समजून न घेता,
प्रतारणा करित असतो स्वतःशीच. 

‘मी’ हसतो, ‘मी’ रडतो, 
‘मी’ रागावतो, ‘मी' प्रेम करतो, 
स्वतःशीच 

‘मी’ झाकोळुन टाकतो 'स्व' ला,
 विचारून बघता स्वतःला,
 वाटे ‘मी’ च उत्तर देईल कदाचित,
कारण ‘मी' प्रतारणा  करित असतो स्वतःशीच!

©



Saturday, January 4, 2020

तो आणि आपण सगळेच



तो, कुणितरी स्वप्न बघत असतो,  
स्वतःलाच आव्हाहन देत डिवचून घेत असतो.

तो, आदर्शांना अनुसरतांना, 
एक नविन आदर्श निर्माण करत असतो.
प्रतिकुलतेच्या पुढे जाऊन,
परिस्थितीशी दोन हात करण्याचा                                                                                              संदेश देत असतो. 

तो, नव्या संधी निर्माण करण्यासाठी,
नवी क्षितीजे धुंडाळत असतो. 
'स्व' च्या अर्थाचा शोध घेऊन, 
दूर्दम्यचा दीप बनुन तेवत राहतो.

तो, छोटे छोटे मोह टाळतांना,
मोठे त्याग करत राहतो.
दिवसा खपत, रात्री तेल जाळत, 
ध्येयाकडे वाटचाल करत राहतो.

तो चुकतो,मग हरतो,
नि रडतो,तडफडतो.
रोज झुरतो,
नि स्वतःवरच उखडतो.

तो, धीर देतो, विश्वास ठेवतो
प्रत्येकाचा स्विकार करतो.
जीवनावर प्रेम करतांना, 
तत्वांशी प्रामाणिक होत राहतो.

तो  तुझ्यात, तो माझ्यात,  
कधीतरी आढळतो तो आपणा सगळयांत.
अस्तित्वाच्या संघर्षात, जगण्याच्या चढाओढीत
आशेचा एक किरण,विश्वाच्या असण्याचे रहस्यतो’.©


                                    
                                                                                                                                 



Sunday, December 1, 2019

आहे अजूनही



आहे अजूनही तुझे स्वर माझ्या कानात,
आहे अजूनही तुझे हास्य माझ्या डोळ्यात .
आहे अजूनही तुझा चेहराा माझ्या मनात ,
आहे अजूनही तुझी प्रत्येक आठवण माझ्या ह्रुदयात.

आहे अजूनही फुलांमध्ये गंध.
आहे अजूनही आकाशमये निळा रंग.
आहे अजूनही मेघान्मध्ये पाऊस आहे,
अजूनही तूच माझी फक्त हाउस.

आहे अजूनही माझे स्वप्न तू ,
आहे अजूनही माझे गीत तू,
आहे अजूनही माझ्या शब्दात तू ,
आहे अजूनही मिटलेल्या माझ्या डोळ्यात फक्त तु.
आहे अजूनही मी तोच, पण का होशिल पुन्हा एकदा अजूनही तशिच तू?©
                                              
                                                              

Saturday, September 14, 2019

श्री सखी

   
मना मध्ये का अशी चुन चुन,
तुझा विचार देऊन जातो ,
आयुष्यात माझ्या अशी वेळ यावी,
माझाच मी हेवा करू पाहतो .

तू समीप असतांना,
माझं मन नसतं माझ्या सोबतीला,
डोलते मन माझं, तुझ्या स्मित हास्याला,
अन अलगद जाऊन बसतं तुझ्या ओठाच्या कळेला.

एकांत असावा तू अन मी ,
दोघेच करू गुजगोष्टी ...
आयुष्यभराची संगत,
निवांतपणा आणि सोबत तुझी.©

                                   

Wednesday, August 21, 2019

दिवा ,तू जळत राहा.

 त्याचं  प्रेम  तेवता  दिवा  होतं ,
ऊन,  पाऊस,  वारा,  सावलीत   जपलेला  ठेवा  होतं .

कदाचित   दिवा ,चमकून  झगमगाट  करायला  असमर्थ  होता ,
पण  दिवा  तेवत  राहतो  ,
ऊन  पाऊस  वारा  सावलीत   सारखाच  जळत  राहतो,
ऊजेल त्याचा  कदाचित  तितकासा  होत  नाही ,
पण  दिवाच  होता  तो ,
त्याच्या  गुणाने  जळत  राहतो ,

अरे दिवा ,
तू  मुजोर  आहेस,
दिवा  तू  तर  तुझ्यापुरताच रे,
का  इतका तू  आपलपोट्या?
दिवा  तू  वाइईट  आहेस,
तू  अंधारातच  दिसतोस,
तुझी  मला  गरज  नाही,
तू  तर  नेहमी सारखाच दिसतोस,
कधी  तरी  जास्त  उजळ  हो,
तू  तर  तुझ्याच  खोली  पर्यंत
बाहेर  तर तू  नाशवंत.

तुझी लायकी नाही दिवा,
तुझा ऊजेल मला पाहिजे नाही ,
दिवा तुझा  ऊजेल मला दिसत नाही,
दिवा तुझ्या अश्या जळण्याचा काही उपयोग नाही.
तुझ्या असण्याने आणि नसण्याने  ,
ऊजेल तर सारखाच,
असशील तू उपयोगी अंधारात,
सारखा जळायला तुझी तर ऊब पण मला जाणवत नाही.

सूर्य चंद्र ताऱ्यांच्या प्रकाशात,
दिवा तू तर शहाणा आहे,
दिवा माझा ऐक,
तुझी खोली अन तुझा ऊजेल,
स्वतःपुरता तुझा  खेळ.
काय  ठेवतो  म्हणतो  एकजात,
कधी   खोली  उजळून  दाखवलीस  तू,
मला  कधी ऊब  दिलीस  तू.

दिवा तू जळत राहा,
कधी जर अंधारलं तर मी येईन,
झगमगाट जर गेला तर दिवा तू असशील ना,
काळ्या अंधारात तुझ्या खोलीत तुझा तेवढा प्रकाश असेल ना,
मी येईन, मी थांबेन,
अंधार ओसरेपर्यंत मी वाट पाहीन,
कदाचित तुझ्या जळण्याचा मला तेव्हा भास होईल,
तू  माझ्यासाठी  जळत  होता  नेहमीच,
पण मला तुझा प्रकाश तेवढा का जाणवला नाही,

तुझा  सौम्य  ऊजेल,
तुझी  तेवढीशी  खोली,
तुझी  ती  सारखी  तेवत  असणारी  वात,
दिवा जळत राहा, अंधार होईल कधी
काही काळा पुरता,
दिसशील तेव्हा  तू, कि तू जळतोय नेहमीच,
एकसारखा .
म्हणेल  तुला  मी  'दीपक'  कधीतरी
सारखा  ऊजेल  असणारा,
ऊन  पाऊस  सावलीत सोबत  करणारा,
वाट  दाखवणारा ,जळून  उजाळणारा.

दिवा शांत होता, स्वतःशीच पुटपुटत होता,
माझा ऊजेल माझ्यापुरताच,
माझा जाळ माझ्यापुरताच,
मी  माझ्यापुरताच।©

Bharat Ek Khoj

 The Vedic hymns being sung in such a serious chorus followed by its Hindi translation equally impactful and in screen one sees the famed re...