तो, कुणितरी स्वप्न बघत असतो,
स्वतःलाच आव्हाहन
देत डिवचून घेत असतो.
तो, आदर्शांना अनुसरतांना,
एक नविन आदर्श
निर्माण करत असतो.
प्रतिकुलतेच्या
पुढे जाऊन,
परिस्थितीशी दोन
हात करण्याचा संदेश देत असतो.
तो, नव्या संधी
निर्माण करण्यासाठी,
नवी क्षितीजे
धुंडाळत असतो.
'स्व'
च्या
अर्थाचा शोध घेऊन,
दूर्दम्यचा दीप
बनुन तेवत राहतो.
तो, छोटे छोटे मोह
टाळतांना,
मोठे त्याग करत
राहतो.
दिवसा खपत, रात्री तेल जाळत,
ध्येयाकडे वाटचाल
करत राहतो.
तो चुकतो,मग हरतो,
नि रडतो,तडफडतो.
रोज झुरतो,
नि स्वतःवरच उखडतो.
तो, धीर देतो,
विश्वास
ठेवतो,
प्रत्येकाचा स्विकार करतो.
जीवनावर प्रेम करतांना,
तत्वांशी
प्रामाणिक होत राहतो.
तो तुझ्यात,
तो
माझ्यात,
कधीतरी आढळतो तो
आपणा सगळयांत.
अस्तित्वाच्या
संघर्षात, जगण्याच्या चढाओढीत,
आशेचा एक किरण,विश्वाच्या असण्याचे रहस्य
‘तो’. ©
