त्याचं प्रेम तेवता दिवा होतं ,
ऊन, पाऊस, वारा, सावलीत जपलेला ठेवा होतं .
कदाचित दिवा ,चमकून झगमगाट करायला असमर्थ होता ,
पण दिवा तेवत राहतो ,
ऊन पाऊस वारा सावलीत सारखाच जळत राहतो,
ऊजेल त्याचा कदाचित तितकासा होत नाही ,
पण दिवाच होता तो ,
त्याच्या गुणाने जळत राहतो ,
अरे दिवा ,
तू मुजोर आहेस,
दिवा तू तर तुझ्यापुरताच रे,
का इतका तू आपलपोट्या?
दिवा तू वाइईट आहेस,
तू अंधारातच दिसतोस,
तुझी मला गरज नाही,
तू तर नेहमी सारखाच दिसतोस,
कधी तरी जास्त उजळ हो,
तू तर तुझ्याच खोली पर्यंत
बाहेर तर तू नाशवंत.
तुझी लायकी नाही दिवा,
तुझा ऊजेल मला पाहिजे नाही ,
दिवा तुझा ऊजेल मला दिसत नाही,
दिवा तुझ्या अश्या जळण्याचा काही उपयोग नाही.
तुझ्या असण्याने आणि नसण्याने ,
ऊजेल तर सारखाच,
असशील तू उपयोगी अंधारात,
सारखा जळायला तुझी तर ऊब पण मला जाणवत नाही.
सूर्य चंद्र ताऱ्यांच्या प्रकाशात,
दिवा तू तर शहाणा आहे,
दिवा माझा ऐक,
तुझी खोली अन तुझा ऊजेल,
स्वतःपुरता तुझा खेळ.
काय ठेवतो म्हणतो एकजात,
कधी खोली उजळून दाखवलीस तू,
मला कधी ऊब दिलीस तू.
दिवा तू जळत राहा,
कधी जर अंधारलं तर मी येईन,
झगमगाट जर गेला तर दिवा तू असशील ना,
काळ्या अंधारात तुझ्या खोलीत तुझा तेवढा प्रकाश असेल ना,
मी येईन, मी थांबेन,
अंधार ओसरेपर्यंत मी वाट पाहीन,
कदाचित तुझ्या जळण्याचा मला तेव्हा भास होईल,
तू माझ्यासाठी जळत होता नेहमीच,
पण मला तुझा प्रकाश तेवढा का जाणवला नाही,
तुझा सौम्य ऊजेल,
तुझी तेवढीशी खोली,
तुझी ती सारखी तेवत असणारी वात,
दिवा जळत राहा, अंधार होईल कधी
काही काळा पुरता,
दिसशील तेव्हा तू, कि तू जळतोय नेहमीच,
एकसारखा .
म्हणेल तुला मी 'दीपक' कधीतरी
सारखा ऊजेल असणारा,
ऊन पाऊस सावलीत सोबत करणारा,
वाट दाखवणारा ,जळून उजाळणारा.
दिवा शांत होता, स्वतःशीच पुटपुटत होता,
माझा ऊजेल माझ्यापुरताच,
माझा जाळ माझ्यापुरताच,
मी माझ्यापुरताच।©
ऊन, पाऊस, वारा, सावलीत जपलेला ठेवा होतं .
कदाचित दिवा ,चमकून झगमगाट करायला असमर्थ होता ,
पण दिवा तेवत राहतो ,
ऊन पाऊस वारा सावलीत सारखाच जळत राहतो,
ऊजेल त्याचा कदाचित तितकासा होत नाही ,
पण दिवाच होता तो ,
त्याच्या गुणाने जळत राहतो ,
अरे दिवा ,
तू मुजोर आहेस,दिवा तू तर तुझ्यापुरताच रे,
का इतका तू आपलपोट्या?
दिवा तू वाइईट आहेस,
तू अंधारातच दिसतोस,
तुझी मला गरज नाही,
तू तर नेहमी सारखाच दिसतोस,
कधी तरी जास्त उजळ हो,
तू तर तुझ्याच खोली पर्यंत
बाहेर तर तू नाशवंत.
तुझी लायकी नाही दिवा,
तुझा ऊजेल मला पाहिजे नाही ,
दिवा तुझा ऊजेल मला दिसत नाही,
दिवा तुझ्या अश्या जळण्याचा काही उपयोग नाही.
तुझ्या असण्याने आणि नसण्याने ,
ऊजेल तर सारखाच,
असशील तू उपयोगी अंधारात,
सारखा जळायला तुझी तर ऊब पण मला जाणवत नाही.
सूर्य चंद्र ताऱ्यांच्या प्रकाशात,
दिवा तू तर शहाणा आहे,
दिवा माझा ऐक,
तुझी खोली अन तुझा ऊजेल,
स्वतःपुरता तुझा खेळ.
काय ठेवतो म्हणतो एकजात,
कधी खोली उजळून दाखवलीस तू,
मला कधी ऊब दिलीस तू.
दिवा तू जळत राहा,
कधी जर अंधारलं तर मी येईन,
झगमगाट जर गेला तर दिवा तू असशील ना,
काळ्या अंधारात तुझ्या खोलीत तुझा तेवढा प्रकाश असेल ना,
मी येईन, मी थांबेन,
अंधार ओसरेपर्यंत मी वाट पाहीन,
कदाचित तुझ्या जळण्याचा मला तेव्हा भास होईल,
तू माझ्यासाठी जळत होता नेहमीच,
पण मला तुझा प्रकाश तेवढा का जाणवला नाही,
तुझा सौम्य ऊजेल,
तुझी तेवढीशी खोली,
तुझी ती सारखी तेवत असणारी वात,
दिवा जळत राहा, अंधार होईल कधी
काही काळा पुरता,
दिसशील तेव्हा तू, कि तू जळतोय नेहमीच,
एकसारखा .
म्हणेल तुला मी 'दीपक' कधीतरी
सारखा ऊजेल असणारा,
ऊन पाऊस सावलीत सोबत करणारा,
वाट दाखवणारा ,जळून उजाळणारा.
दिवा शांत होता, स्वतःशीच पुटपुटत होता,
माझा ऊजेल माझ्यापुरताच,
माझा जाळ माझ्यापुरताच,
मी माझ्यापुरताच।©
No comments:
Post a Comment