अशांतता वाटते मनात, भंग होते भान
नको वाटतो आता हा नेहमीचा किलकिलाट
रोजचा पराभव पचविण्यासाठी, रोजच् थोडुशी घेउन तात्पुर्ती का होईना आत्महत्या करायची .
आयुष्य समुद्रात कंपास मॉडेलल्या जहाजा सरखे भरकटून समाधिस्त होते जनू,
डाव तर हरलेला,अर्ध्यातच बहुतेक का नाही मग सोडु?
माणसे जंगलातल्या पशूंनाही लाजवतिल इतकी विचित्र,
हरामी, भिकारचोट आणि विक्षिप्त.
शेती करतय एक, पाकिटात पॅक करून विकतो दुसराच,
सगळाच सावळा गोंधळ, सामान्य मानसाला घालतय गंडा,
अक्कल ठेवली गहान देऊलाच्या पायथ्याशी,
शिक्षण रोजगाराची गरज, ती कशी लक्ष्यात यायची ?
मार्क्स सांगून गेला आधीच दीडशे वर्षां आगोदर
अफीम आहे ते नका लागू नादी,
पण आम्ही बसलोय तेच फुकत, बिनबुडाच्या चर्चा करत.
स्वातंत्र्य समता बंधुता भारताच्या संविधानाची पायदळी तुडवत!
अशांतता वाटते मनात, भंग होते भान .
- अक्षय
No comments:
Post a Comment